Tag Archive | लग्न

Challenge

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,
“एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन,
मैल, मेसेज काहीही करायचे नाही
जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी
लगेच लग्न करेन ……..!!!”
मुलगी म्हणाली, “खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ……….. पण तरीही आज तू
मला
challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस
काहीही contact न करण्याचे
challenge स्वीकारत आहे !”.
एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने
त्या मुलाला भेटायला
त्याच्या घरी जाते ….. पण …..घरात पोचताच
ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व
वरती हार घातलेली
body बघते आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो ….. तिला
हे अस कस झाले ? , का झाले ?? ..काहीच कळत नव्हते.
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते …. कंठ
दाटून आलेला
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या …
तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने
तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात
लिहिले होते , ” कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे
शेवटचा एकच दिवस
राहिला होता म्हणून मला तुला challange करावे
लागले …..आणि तू ते करून दाखविलेस, आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे*……..

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

दिसतं तसं नसतं

*** मी १ वाचलेली कथा ****
एके दिवशी काय झाले एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्याच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त
हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत…हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा …ओरडतो.. ”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत…”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका… सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू
शकते..)

%d bloggers like this: