Tag Archive | मराठी

​मुळाक्षरे आणि आरोग्य थोडक्यात वर्ड व्हायब्रेशन थेरपी

मला whatsapp  वर आलेला एक छोटा लेख आज मी इथे सर्वांसोबत शेअर करत आहे.
​मुळाक्षरे आणि आरोग्य थोडक्यात वर्ड व्हायब्रेशन थेरपी
आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो. आणि आपले आरोग्य सुधारते.
षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं, शं,षं सं  / बं, भं, मं, यं, रं, लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली. आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.
लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.
मी सातारला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या आणि  दुखणे थांबले. त्यांनी माझ्या मुलीला (मुलगी सातारला असते) फोन करून हा अनुभव सांगितला.
एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता.डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’
डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो ‘कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो ‘तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा!’ मी सोमवारी औषधे पाठवली. ती गुरुवारी पत्ता सापडत नाही म्हणून परत आली. गुरुवारी रात्री डोम्बिवालीहून फोन आला. ‘औषधे मिळाली नाहीत पण अक्षरे म्हणून फायदा झाला.’
सातारच्या एका आजींनी (वय ७२) त्यांचे बरेच त्रास सांगितले. त्यांना बीपी, बद्धकोष्टता,  अशक्तपणा, मधेच अस्वस्थ होणे वगैरे अनेक त्रास होते. बरेच डॉक्टर झालेहोते. मी म्हटले तुम्ही पुण्याला आल्यावर मला भेटा म्हणजे मी काही औषधे देऊ शकेन फोन वरून कसे काय काही देता येणार? त्यावर त्या म्हणाल्या, ‘अहो मी घरातून रिक्षापर्यंत नाही जाऊ शकत तर पुण्याला कसली येते?’ मी त्यांना शिवांबू घेण्यास सुचविले. परंतु त्यांची तयारी नव्हती. मग मी त्यांना मराठीतील अक्षरे अनुस्वार देऊन कशी म्हणायची हे फोनवरच सांगितले. त्यांनी दररोज १०० वेळा ही अक्षरे म्हणायला सुरवात केली. एक महिन्यांनी दररोज दोन वेळा पुढील महिन्यात रोज तीन वेळा म्हणायला लागल्यानंतर त्यांचे फोन येणे बंद झाले.

सहा महिन्यानंतर माझ्या ऑफिसवर एक आजी मला भेटायला आल्या. म्हणाल्या, ‘माझे नाव दाते. मी सातारहून आले आहे.’ मला आश्चर्य वाटले. पुढे म्हणाल्या, ‘मला फोन वरून सल्ला देऊन बरे करणारी व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी व तुम्हाला भेटण्यासाठी मुद्दाम आले आहे. आता माझी तब्येत ठीक आहे. मी दररोज अक्षरे म्हणते.’ त्या मला भेटण्यासाठी एसटी ने पुण्याला आल्या होत्या.
माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास होता. माझेकडे राहिला आल्यावर दोन दिवसात मेदूवडे केले होते. तेलकट म्हणून वड्याचा वरचा भाग काढून दोन लहान वडे खाल्ले. थोडा त्रास वाटला. मी तिला सर्व अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. ती दररोज म्हणायला लागली अठवड्याभरानी परत मेदूवडे केले होते, तेव्हा तिने जसेच्या तसे ५-६ वडे सांबर घेऊन खाल्ले. आणि तिला बाधले नाहीत.
पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!
आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.
मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बरेचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्

रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते. आपल्याला जरूर फायदा होईल. आपले अनुभव मला जरूर कळवावेत.
मूलाधार चक्राची अक्षरे –
वं, शं, षं, सं
स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे –
बं, भं, मं, यं ,रं, लं
मणिपूर चक्राची अक्षरे –
डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं
अनाहत चक्राची अक्षरे-
कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं
विशुद्ध चक्राची अक्षरे-
अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः
अज्ञ चक्राची अक्षरे-
हं, क्षं
अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले ‘षट्चक्रे आणि आरोग्य’ हे पुस्तक अभ्यासावे.
वरिल लेखाला ग्रंथाधार शास्त्राधार आहे की नाही मला माहीत नाही. ज्या अभ्यासूंना ग्रंथाधाराची गरज वाटते त्यांनी ग्रंथ शोधावेत मला विचारू नये. माझे काम अनुभव घेणे व फायदा झाला तर इतरांना सांगणे हे आहे.

अरविंद जोशी BSc

९४२१९४८८९४

Advertisements

आधार कार्ड !!!

आधार कार्ड

“शेठ! शेठ! हे बघा माझे आधार कार्ड आले.. ” असे चढत्या आवाजात म्हणत मोठ्या उत्सुकतेने आमचा गड़ी मला त्याचे ते सरकारी आधार कार्ड दाखवायला आला … ते कार्ड मी हातात घेतले आणि त्याचा तो चमत्कारिक हसमुख परग्रही फोटो पहिला … पन्नाशी मधला तो आमचा चार फूटी नोकर खुप खुश होता ते कार्ड पाहून …त्याच्या डोळ्या मधे ती उत्सुकता पाहून मी काही प्रतिक्रिया दिली नाही ..

ते पाहून तो शांत उभा राहिला … मी त्याला पाकिटातुन १० रुपये काढून दिले आणि म्हंटले “चल जा चहा पियून ये .”

हाच गड़ी मागच्या लोकसभा मतदानावेळी पंजा ला मत द्यायला निघाला होता .. मी त्याला रोखले तर तो बोलला कि मी १० हुन अधिक वेळ पंजालाच मत दिले आहे .. मी त्याला पाहिले समजावले मग रागावले आणि बोललो कि इंजिन,धनुष्यबाण,उगवता सूर्य ,सायकल , विमान, म्हातारीची काठी,पैठनिची साडी  कशालाही मत दे पण पंजाला नाही …नाहीतर नोकरिहून काढेल! याद राख !!

निवडनुकिचा निर्णय लागला, पंजाच निवडून आले , मी त्याला मिरवनुकित दारू पियून नाचतान्ना पण पाहिले. त्याचा मित्र त्याला बोलला ” ये तिकडे बघ कि .. तुझा शेठ आला ” ..

मला घाबरून तो गुपचुप ट्रक मागे लपला … दुसर्यादिवशी  कामावर आल्यावर काही बोलण्यआधी ” शेठ शप्पथ मी इंजिनलाच मत दिले होते” अशी वल्गना करू लागला .”

मी मोठ्याने हसू लागलो आणि बोललो “काही हरकत नाही.”

गेले ते दिवस आता, तो आता आमच्या घरी येतो टीवी पहायला ..त्याला आता अन्ना आवडू लागले आहे .. मराठी,हिंदी अणि न समजणारे इंग्लिश बातमीपत्र मोठ्या हौशीने पाहतो ..त्याला इतके दिवस अन्ना पण पंजावालेच आहे असेच वाटायचे. मी सांगितले तेव्हा ते पंजाचे नाही हे त्याला समजले. वयाच्या अंतिम टप्यापर्यन्त त्याला सरकार ने निराधार बनवले पण यमसदनी धाडण्याआधी  आधारकार्ड चा आधार मात्र तर दिला …असो पोटात खंजीर खुपसून कामापुरती हळद तर लावली त्याला त्याच्या राजाने …तो खुश आहे! आणि हेच तर सरकार चे काम आहे जनतेला खुश ठेवणे !!

कुठेतरी छानसे वाचलेले …………………………………

%d bloggers like this: