Tag Archive | पत्नी

भाऊबीज

भाऊबीज

भाऊबीज हा दिवाळीच्या मुक्कामातील शेवटचा दिवस. यम आणि यमी या सहोदर बंधू-भगिनीने भाऊ-बहिणीच्या स्वयंशासनाचे बंधन निर्माण करून भावी पिढ्यांसमोर संस्कृतीचा जो नवा आदर्श निर्माण केला, त्याची ही आठवण. एरव्ही विवाहित स्त्री सासरी असताना, आपल्या पतीची पत्नी, दिराची व नणंदेची भावजय, सासू-सासर्‍यांची सून आणि मुलाची आइर् असते. केवळ भाऊबीज हा एकच दिवस असा असतो की, त्या वेळी ती आपल्या भावाची बहीण असते

यमद्वितीया या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविलं होतं म्हणून ‘भाऊबीज’ हा सण साजरा करतात.

या दिवशी भाऊ बहिणीला भेटावयास जातो. तो बहिणीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. काही कारणाने एखाद्या बहिणीला जर कोणी भाऊच नसला तर चंद्राला भाऊ मानून ती त्याला ओवाळते.

कुठेतरी छानसे वाचलेले ………

भाऊबीज च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…………………….

Advertisements

अखेरचा डाव….! (हॅपी व्हॅलेंटाईन)

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
“तो’ पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि “ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही…’ ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या “हॅपी मूड’मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,””आज एकदम मूड चेंज, काय भानगड?’
“”ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!”
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर “ए मेरी जोहराजबी…’ची शीळ आलीच.
“चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच “टॅक्‍सी’ या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. “किशोरी’ मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
“”जरा तिकडं बघतेस!’ असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.”
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या…
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
“जाईन विचारीत रानफुला…’ किशोरींनी सुरू केलं आणि… वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना “तो’ आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
“नाही म्हणूच शकले नाही!’
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना “त्याला’ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना… आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले…बाहेर आले…
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले… बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
“काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये…घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग “किशोरी’ तीही पहिल्या रांगेत बसून…गजरा…रेस्टॉरंट आणि आता इथे… काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
“बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी’ म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, “हॅपी व्हॅलेंटाईन!’
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
“पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!’
“कशाला?’
“दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले! .

कुठेतरी छानसे वाचलेले ……… ( सकाळ मुक्तपीठ मधील प्रसाद इनामदार यांचा लेख )

कसाब……..

Kasab-mumbai-attack-26_11

कसाबच्या च्या फाशीला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली  .. सर्वोच्य न्यायालय ही भारतीय लोकशाही व्यवस्थेची सर्वात मोठी संस्था आहे आणि त्यांचा निर्णय हां फक्त मानला जावा हेच संकेत आहे आणि मी काही वेगळ करणार नाही … कसाब जगतो आहे ..कसाब फळतो आहे … जर शांति,दया,क्षमा हे गुण जगात सर्वश्रेष्ठ असतील तर असोत, पण आम्ही ते आता नाही पाळणार … जोवर कसाब जिवंत आहे आम्ही आमच्या आतील आग विझू नाही देणार .. जर कोणी पण उठून ह्या देशावर हल्ला करत असेल तर तो काय त्याचे खानदान आणि देश हां राखेत गेला पाहिजे हेच आमचे मत मग कोणी आम्हाला माथे फिरू म्हंटल तरी चालेल, मग कोणी आम्हाला माणुसकी हरवलेला म्हंटले तरी चालेल … विधवा झालेल्या शहीद पत्निंचे आणि पुत्र गमावलेल्या शहीद मातांचे दुःख हे कसाबच्या मानव अधिकाराहून मोठे नाही हे नक्की …
कसाबला ह्या जगात श्वास घेण्याचा पण अधिकार नाही आहे हेच आमचे मत … त्याच्या प्रत्येक श्वासामधून आत जाणारा प्राण वायु आमचे प्राण अस्वस्थ करत आहे … कदाचित आता देशात नक्कीच संभ्रमाची स्थिति आहे कारण कोणाचे लालनपालन करायचे आणि कोणाला दण्डित करायचे हेच कोणाला कळत नाही आहे अस वाटत आहे … पाकिट,पर्स चोरनार्या माणसाला जनता जीव जाई पर्यंत मारते …. आत्महत्या करणार्या शेतकर्याला बाउंस होणारे चेक दिले जाता .. तर भारताला संपवन्याचे स्वप्न पाहणारे खुशाल जगत आहे … मी अनेक वाईट वृत्तीचे लोक पाहिले आहे पण त्यांच्या अहंकाराला देखिल स्वाभिमानाचा पदर असतो पण हे अफझल गुरु आणि कसाब च्या बाबतीत निर्णय घेणारे नक्की काय समस्या घेउन जगत आहे तेच समजत नाही मला ?
१९४७ साली ‘मेरा भारत महान’ हे मुखी घातलेले लोलीपोप आणखी किती दिवस आम्ही चघळत बसायचे? जर शक्य नसेल तर कशाला दाखवता विकासाची स्वप्ने ? आणि कोणाचा आणि कसला विकास ? जनतेच्या प्रार्थनेला आता देव पण वैतागला असेल… काय ह्या देशात कसाब आणि अफझल गुरुला फासावर चढवेल अशी नैतिकतेची दोरीच शिल्लक राहिली नाही आहे का ?
जर बांगडी ह्या देशाचे राजकीय चिन्ह असते तर आम्ही देखिल ती आमच्या भावना दाबुन ती घालून घेतली असती पण चार सिंह घेउन चार दिशांना अन्याय विरुद्ध लढ़न्याचे ध्येय उराशी असणारी भारत माता प्रतिक असनारा हा देश आणि भारत माता कोणत्या मुखाने हे वाटोळ पाहत असेल ?
चावणारे डास संपवन्या साठी करोडो खर्च करणारी सरकार एक राक्षसाला का पोसत आहे ह्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल हे नक्की …!

%d bloggers like this: