Tag Archive | आई

चिमणी

यु ट्यूब वर एक short film पहिली होती तीच कथा इथे मांडली आहे.

चिमणी

चिमणी

कदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक चिमणी आली….
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला चिमणी.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले चिमणी.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले,चिमणी…………
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
चिमणी…… चिमणी… चिमणी.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले ती चिमणी होती म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका

Advertisements

भाऊबीज

भाऊबीज

भाऊबीज हा दिवाळीच्या मुक्कामातील शेवटचा दिवस. यम आणि यमी या सहोदर बंधू-भगिनीने भाऊ-बहिणीच्या स्वयंशासनाचे बंधन निर्माण करून भावी पिढ्यांसमोर संस्कृतीचा जो नवा आदर्श निर्माण केला, त्याची ही आठवण. एरव्ही विवाहित स्त्री सासरी असताना, आपल्या पतीची पत्नी, दिराची व नणंदेची भावजय, सासू-सासर्‍यांची सून आणि मुलाची आइर् असते. केवळ भाऊबीज हा एकच दिवस असा असतो की, त्या वेळी ती आपल्या भावाची बहीण असते

यमद्वितीया या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविलं होतं म्हणून ‘भाऊबीज’ हा सण साजरा करतात.

या दिवशी भाऊ बहिणीला भेटावयास जातो. तो बहिणीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. काही कारणाने एखाद्या बहिणीला जर कोणी भाऊच नसला तर चंद्राला भाऊ मानून ती त्याला ओवाळते.

कुठेतरी छानसे वाचलेले ………

भाऊबीज च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…………………….

आपण खरच कीती बिझी आहोत !

जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती. काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती. ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. – एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का? – तो घेण्यासाठी आपण थांबतो का? – अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का? या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे? बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा…

%d bloggers like this: