एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस

उन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस ..

शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत

नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे .

एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातून (पक्षी- नाकांच्या नळकांड्यांतून) असे आत बाहेर खेचत काढत असतात की कधी यांचा प्राण फट् म्हणता निघून जाईल काय अशी धास्ती वाटावी. नाहीतर maintenance च्या नावाखाली ती बाग बंदच असते सकाळी

असो.

आज अचानक तिकडून जाताना पाय आपसूक वळले बागेकडे…कारण अपरिचित मंद सुगंधांचा एकत्रित दरवळ …

आत गेलो आणि मग तिथेच फिरत बसलो. कारण सोबतचे फोटो बघून कळेलच

विविध फुलपाखरे, १-२ बगळे, भारद्वाज, दयाळ, बुलबुल आणि काही मला अज्ञात असलेल्या नावांचे पक्षी तिकडेच बघणे हा added benefit आणि उद्यानाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत चरणार्या हरीणांचा कुटुंबकबिला दिसणे म्हणजे तर दुधात केशरच जणू…

उद्यानात मध्यभागी एक छान झरादेखील बनवला आहे. पण तो मात्र तेवढा बंद होता.

आजीबरोबर गणित शिकून समजावून घेत कालचा गृहपाठ पूर्ण करणारा एक छोट्या आणि हातात हात गुंफून उद्याची स्वन बघण्यात मग्न एक युगुलं… ते पण शेजारी शेजारी बसलेलं. हे भन्नाट होतं 😀

फुलांची नावं मला माहीत नाहीत तर काही ठिकाणी लिहीली असूनही झाकली गेली आहेत पानांमध्ये…

Advertisements

ऊपकार

बदमाश स्त्रियांना आळा घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर प्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे….*

पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या “पत्नीचा” आकस्मिक मृत्यु होतो.

बर्याच लोकांनी त्याला दूसर्या लग्नाचा सल्ला दिला परंतु *”माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन”* असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले.

बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले.

हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.

बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले.

जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले.

जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.

दुसर्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला *”बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत”* पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले *”बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्या आईची गरज नाही”*

यावर मुलगा म्हणाला *”बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही.”*

कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.

*मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही !*
_____/\_____

कचरा कोंडी

*…………कोंडी………..*

औरंगाबादच्या *’कचरा कोंडीची* ‘बातमी पाहून माझ्या मनात विचार आला,
केवळ औरंगाबादच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो.
याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का?

आपण *कमीतकमी कष्ट करून जास्तीत जास्त* सुखात राहायचा प्रयत्न करतोय. *वापरा आणि फेका* ही प्रवृत्ती जपतोय.
घरात छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपण लगेच *’यूज अँड थ्रो ‘ वाले ग्लास, चमचे,द्रोण, डिश* आणतो , वापरतो आणि फेकून देतो.घरात शोकेस मध्ये मारे ऐटीत ग्लास ,डिनर सेट ठेवलेले असतात, पण ते वापरले तर परत धुणार कोण? म्हणून आपण ते फक्त शोकेसची शोभा वाढवण्यासाठीच ठेवतो, *धुवायला* वेळ कोणाला आहे ?
पूर्वी गावाला जाताना आपण मोठ्या *वॉटर बॅग्ज* न्यायचो.पण आता ठिकठिकाणी *बिस्लरीच्या* बाटल्या घेतो,वापरून फेकून देतो.
लहान मुलांचे *’लंगोट*’ हा प्रकार तर आपण विसरूनच गेलोय. *हगीज,सॅनिटरी नॅपकिन्स*! हात पुसायला *रुमाल* ऐवजी *पेपर नॅपकिन्स*! बापरे! वापरा आणि फेका असा किती कचरा टाकतो आपण !
पूर्वी वाण सामान आणताना घरातूनच तेलाची बरणी, तुपासाठी *डबा* न्यावा लागायचा.आता यासाठी विविध प्रकारच्या पॉलिथीन *पिशव्या किंवा बाटल्या* मिळतात,नंतर त्या आपण फेकतोच.
पूर्वी लग्नाचा कितीही मोठा *’बस्ता ‘* बांधला तरी तो एकाच मोठ्या कापडात ‘ *गाठोडं’* करून मिळायचा.आता प्रत्येक साडीसाठी व कपड्यासाठी *स्वतंत्र पिशवीचा* आपला अट्टाहास असतो.
वस्तू *दुरुस्ती* कडे आपला कल नसतो.बूट, चप्पल,खेळणी,छत्री अशा गोष्टी आपण लगेच *फेकून* नव्या घेतो.
*’वापरा आणि फेका*’अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल.कोणालाही वेळ नाही.रात्र थोडी सोंगे फार.प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?

कंटाळा आला की आपण पटकन एखाद्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करतो,पण हे *पार्सल* फोडल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याने एक अक्खी *कॅरी बॅग* भरते,पण आपण मात्र वेगळ्याच आनंदात असतो.
*विचार बदला. स्थिती नक्की बदलेल. सुरवात सरकारने केली प्लॅस्टीक बंद करून.., तिच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपणा सर्वांवर येणार आहे. आणि या कार्यात आपण आपले योगदान नक्कीच देणार आहोत….!*

संकलित,
*- लेखक ???*

%d bloggers like this: