​*पुणेकर …..*

​*पुणेकर …..*

घाई आणी गर्दीत *दगडूशेठ* किंवा *तळ्यातल्या  गणपतीकडे* बघुन जो जागेवरूनच मनोभावे नमस्कार करतो तो *पुणेकर* !
*बाकरवडी* आणी *श्रीखंड* *चितळेंचच* आणणारा आणि खाणारा तो *पुणेकर !*
एके ठिकाणी मिसळ चापतांना , दुसरी कडची  *मिसळ* कशी भारी ह्याची चर्चा करणारा  पुणेकर !
*कॅम्प* आणि *एफ सी रोडवर ‘हिरवळ’* पहायला जातो तो *पुणेकर !*
पुणे मुंबई प्रवास *डेक्कन क्वीन* ने करून ऑम्लेट खाणारा तो *पुणेकर !*
पुण्यातील *अठरा पेठांची* नावे घडा घडा सांगतो तो *पुणेकर !* 
*पेशव्यांबद्दल आदर* आणि *पेशवाई* चा थाटाबद्दलं अभिमान बाळगतो , तो *पुणेकर!*
कोणत्याही उपनगरात रहात असतांना , मुळ शहरात आल्यावर ‘ *गावांत आलो* ‘ असे म्हणतो , *तो पुणेकर !*
*पुण्याला* ‘ पुना’ म्हणणा-यांचा तिरस्कार करतो तो *पुणेकर!*
*एम एच १२* सोडुन इतर नंबरच्या गाड्यांना गनिम समजतो तो *पुणेकर !*
हेल्मेट वापरण्याबद्दल जो *न्यूनगंड* बाळगतो *तो पुणेकर !*
*इंच इंच* भुमी लढवणार्या सैनिका प्रमाणे *ट्रॅफीक* मधे इंच इंच अंतर गाडी पुढे सरकवतो तो *पुणेकर !*
पुण्यात बाहेरून रहायला येउन स्वतःला *उगाच पुणेकर*

म्हणवणार-याकडे दयाबूद्धीने बघून मनातल्या मनात हसतो तो *पुणेकर !*
*वयाच्या साठीत* आपल्या शाळा कॉलेजचा अभिमान बाळगतो तो *पुणेकर* !
*मानाचे पाच गणपती* चटकन सांगतो तो पुणेकर आणी *विसर्जनाची मिरवणूक* किती तास चालली ह्याची अभिमानाने चर्चा करतो तो *पुणेकर !*
आपल्या व्यवहारी स्वभावाला *कंजूस* आणी *सडेतोड बोलण्याला कुजकट* म्हणणा-यांकडे भुतदयेने बघुन दुर्लक्ष करणारा *पुणेकर !*
प्रत्येक गोष्टीत पुर्वी सारखी मजा राहिली नाही म्हणून *हळहळणारा पुणेकर !* 
खरी *गुणवत्ता* ओळखून मनापासुन दाद देऊन , कौतूक करून , *डोक्यावर बसवतो ,* तो पुणेकर !
*सवाई गंधर्व महोत्सवापासुन* जुन्या गाणांच्या कार्यक्रमांचा रसिकपणे आस्वाद घेतो तो *पुणेकर* !
*जिलब्या गणपती, पत्र्या मारूती ,  पासोड्या विठोबा , खुन्या मुरलीधर , उंटाडे मारूती , दत्ताचे देऊळ, माती गणपती ही देवस्थाने ओळखतो तो पुणेकर!*
खरेदीसाठी मॉल पेक्षा *तुळशीबाग , लक्ष्मी रोड , फॅशन स्ट्रीट* ज्याला जवळची तो पुणेकर !

*श्री ,बेडेकर ,रामनाथ , अप्पा , खिका* ह्या शब्दांची उकल ज्याला जमली तो *पुणेकर !*
*भाऊ महाराजाचा बोळ , पंतसचिवाची पिछाडी, तपकीर गल्ली , तांबे बोळ, घसेटी पुल , खजिना विहीर, साततोटी* ही ठीकाणे ज्याला कळाली तो *पुणेकर !*
*वैशाली ,रुपाली , वाडेश्वर* ह्या खांद्यसंस्थांनांना वारंवार अनुभवण्याचा वारसा जो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवतो तो *पुणेकर !*
आपल्या बोलण्यात *अरेच्चा , आयला , च्यायला , बोंबला पासून अस्खलित , अद्ययावत , यच्चयावत* ह्या सारख्या शब्दांचा वापर सहज करतो तो *पुणेकर !*
सर्वांनी कर जोडावेत असा जो असतो तो *पुणेकर !!!*
*सर्व अस्सल पुणेकरांना समर्पित !!*

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: