इरसाल पुणेरी उत्तर

काही वेळेला ” खोडी ” काढायचं मनात नसतं . पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर ……….
” इरसाल पुणेरीउत्तराची ” चपराक बसते .

उदा .

शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्र मुळात महाराष्ट्र बँकेत होता . त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश , समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच ” चेक ” घेऊन आपल्या महाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले . नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं . ” कॅश कधी होईल ?”

अप्पा म्हणाला , ” उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल .”

ग्राहाकानं विचारलं , ” का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे . वेळ लागतोच कसा ?”

” अहो . उद्या सुट्टी आहे …”.. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !

” पण समोरच तर बँक आहे ….” ग्राहक हेका सोडेना .

मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , ” काका , काय आहे , केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं . प्रोसिजर असते … असं बघा .”

” काही सांगु नका , प्रोसिजर – बिसिजर !”

” ऐका तर काका … वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच .. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील … चेक करतील .. घरी नेतील .. हार घालतील .. म्रुत्यु पास काढतील .. मग वैकुंठकडे ..!!”

” कळलं ..!” फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले। अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा ” न ” विचारता केलेल्या – नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे … पूणं कधी ‘ डल ‘ होत नाही ..!

 

कुठेतरी छानसे वाचलेले ………

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: