कसाब……..
कसाबच्या च्या फाशीला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली .. सर्वोच्य न्यायालय ही भारतीय लोकशाही व्यवस्थेची सर्वात मोठी संस्था आहे आणि त्यांचा निर्णय हां फक्त मानला जावा हेच संकेत आहे आणि मी काही वेगळ करणार नाही … कसाब जगतो आहे ..कसाब फळतो आहे … जर शांति,दया,क्षमा हे गुण जगात सर्वश्रेष्ठ असतील तर असोत, पण आम्ही ते आता नाही पाळणार … जोवर कसाब जिवंत आहे आम्ही आमच्या आतील आग विझू नाही देणार .. जर कोणी पण उठून ह्या देशावर हल्ला करत असेल तर तो काय त्याचे खानदान आणि देश हां राखेत गेला पाहिजे हेच आमचे मत मग कोणी आम्हाला माथे फिरू म्हंटल तरी चालेल, मग कोणी आम्हाला माणुसकी हरवलेला म्हंटले तरी चालेल … विधवा झालेल्या शहीद पत्निंचे आणि पुत्र गमावलेल्या शहीद मातांचे दुःख हे कसाबच्या मानव अधिकाराहून मोठे नाही हे नक्की …
कसाबला ह्या जगात श्वास घेण्याचा पण अधिकार नाही आहे हेच आमचे मत … त्याच्या प्रत्येक श्वासामधून आत जाणारा प्राण वायु आमचे प्राण अस्वस्थ करत आहे … कदाचित आता देशात नक्कीच संभ्रमाची स्थिति आहे कारण कोणाचे लालनपालन करायचे आणि कोणाला दण्डित करायचे हेच कोणाला कळत नाही आहे अस वाटत आहे … पाकिट,पर्स चोरनार्या माणसाला जनता जीव जाई पर्यंत मारते …. आत्महत्या करणार्या शेतकर्याला बाउंस होणारे चेक दिले जाता .. तर भारताला संपवन्याचे स्वप्न पाहणारे खुशाल जगत आहे … मी अनेक वाईट वृत्तीचे लोक पाहिले आहे पण त्यांच्या अहंकाराला देखिल स्वाभिमानाचा पदर असतो पण हे अफझल गुरु आणि कसाब च्या बाबतीत निर्णय घेणारे नक्की काय समस्या घेउन जगत आहे तेच समजत नाही मला ?
१९४७ साली ‘मेरा भारत महान’ हे मुखी घातलेले लोलीपोप आणखी किती दिवस आम्ही चघळत बसायचे? जर शक्य नसेल तर कशाला दाखवता विकासाची स्वप्ने ? आणि कोणाचा आणि कसला विकास ? जनतेच्या प्रार्थनेला आता देव पण वैतागला असेल… काय ह्या देशात कसाब आणि अफझल गुरुला फासावर चढवेल अशी नैतिकतेची दोरीच शिल्लक राहिली नाही आहे का ?
जर बांगडी ह्या देशाचे राजकीय चिन्ह असते तर आम्ही देखिल ती आमच्या भावना दाबुन ती घालून घेतली असती पण चार सिंह घेउन चार दिशांना अन्याय विरुद्ध लढ़न्याचे ध्येय उराशी असणारी भारत माता प्रतिक असनारा हा देश आणि भारत माता कोणत्या मुखाने हे वाटोळ पाहत असेल ?
चावणारे डास संपवन्या साठी करोडो खर्च करणारी सरकार एक राक्षसाला का पोसत आहे ह्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल हे नक्की …!